वाघी–कामारी नाल्यावरील पुलाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; व्हायरल व्हिडिओनंतर चौकशीची मागणी
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा भराव ढासळल्याची घटना ताजी असतानाच हिमायतनगर तालुक्यातील वाघी–कामारी नाल्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुलाच्या कॉलममधील काँक्रीट दगडाने आणि हाताने सहज निघत असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नुकतेच पूर्ण झालेल्या पुलाच्या खांबावरील काँक्रीट सहज तुटत असल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या पुलावरून एखादे अवजड वाहन गेल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या कामात संबंधित विभागाचे अभियंते आणि ठेकेदार यांची कथित संगनमत असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्य...
