Tag: लोह्यातील शेतकऱ्याच्या ‘बांबू बेटा’ची

जलसंधारणातून आर्थिक समृद्धीकडे; लोह्यातील शेतकऱ्याच्या ‘बांबू बेटा’ची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जलसंधारणातून आर्थिक समृद्धीकडे; लोह्यातील शेतकऱ्याच्या ‘बांबू बेटा’ची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

शेती
नांदेड | जलसंधारणाच्या कामातून पर्यावरण संवर्धनासह शाश्वत उत्पन्नाचा मार्ग कसा निर्माण होऊ शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण लोहा तालुक्यातील शेतकरी बालाजी कोटगीरे यांनी उभे केले आहे. त्यांच्या शेतावरील अभिनव ‘बांबू बेट’ प्रकल्पाची जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि या प्रयोगाची सविस्तर माहिती घेतली. सन २०२३ मध्ये उन्हाळ्यात कोटगीरे यांनी आपल्या शेतातील नाल्याचे रुंदीकरण आणि खोलीकरण केले. सुमारे ५०० फूट लांबी, ५ फूट खोली आणि ८ फूट रुंदी असलेल्या नाल्यातून काढलेली माती दोन्ही बाजूंना टाकण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात ही माती पुन्हा नाल्यात वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून त्यांनी नाल्याच्या दोन्ही काठांवर ५ बाय ५ फूट अंतरावर आलोव्हेरी जातीच्या बांबूची लागवड करण्याचा निर्णय घेतला. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले...
error: Content is protected !!