Tag: लोहा-कंधार

लोहा–कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 134 कोटी 58 लाखांचा पिक विमा मंजूर

लोहा–कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 134 कोटी 58 लाखांचा पिक विमा मंजूर

राजकारण, शेती
नांदेड | खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या लोहा–कंधार विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 134 कोटी 58 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असून, यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मंजुरीसाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाली होती, तर काही भागात जमिनीही वाहून गेल्याचे चित्र होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार चिखलीकर यांनी थेट राज्य शासनाकडे पाठपुरावा करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या प्रक्रियेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आमदार चिखलीकर यांनी आभार व्यक्त केले. ...
माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांचा पक्षप्रवेश शिवसेनेला ‘बळ’

माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांचा पक्षप्रवेश शिवसेनेला ‘बळ’

राजकारण
लोहा|शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस ते शिवसेना असा विविध टप्प्यांतून गेलेला माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचा शिवसेनेतील प्रवेश हा पक्षासाठी बळकटी देणारा ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तब्बल बारा वर्षांनंतर त्यांच्या पुढाकाराने झालेल्या राजकीय मेळाव्यात धोंडगे बंधूंनी जमवलेली मोठी गर्दी त्यांच्या जनाधाराची साक्ष देणारी ठरली. सत्तेत किंवा कोणत्याही पदावर नसतानाही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांमुळे गावपातळीवर धोंडगे यांना मानणारा ठोस वर्ग असल्याचे स्पष्ट झाले. आगामी २०२९ मधील परिसीमन, महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे लोहा-कंधार मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर शिवराज धोंडगे यांच्या राजकीय पदार्पणानेही चर्चेला उधाण आले आहे. शंकरअण्णा धोंडगे हे शेतकरी संघटनेचे नेते शरद जो...
error: Content is protected !!