विद्यार्थी ११ दिवसांपासून धरण्यावर; लोकप्रतिनिधींचा पाठिंबा, प्रशासन मात्र उदासीन!
जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेविरोधात SFI-DYFIचे आंदोलन; विरोधी पक्षनेते व खासदारांची भेट, मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार
नांदेड, अनिल मादसवार | जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था दूर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी SFI व DYFI नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. मात्र, ११ दिवसांपासून विद्यार्थी आंदोलनावर ठाम असतानाही जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाने अद्याप ठोस भूमिका घेतली नसल्याने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरिष्ठ नेते तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्या...
