डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
• समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी• जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न
नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून समाजातील नागरिकांनी लेखणी हातात घेतली असून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची मोठी प्रगती झाली आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विचार समाजात पोहोचण्यासाठी सातत्याने वाचन करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस महापौर कविता मुळे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अं...
