लाळखुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १३ ऑगस्टपासून सुरुवात
फेरी-९ अंतर्गत राज्यभर लसीकरण; १ कोटी लसमात्रांचे वितरण सुरू
नांदेड| राज्यातील पशुधनाचे लाळखुरकूत (एफएमडी) या घातक विषाणूजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे ‘लाळखुरकूत (एफएमडी) लसीकरण मोहीम फेरी-९’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला १३ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभर सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आयव्हीबीपी संस्थेकडून प्राप्त झालेल्या १ कोटी लसमात्रांचे शीत साखळीच्या माध्यमातून सुरक्षितपणे वितरण सुरू करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेच्या कोल्ड रूममध्ये लस साठवून ठेवण्यात आली असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांपर्यंत लस वेळेत पोहोचविण्याची कार्यवाही सुरू आहे.
लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्यापूर्वी सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक लससाठा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यानुसार उपलब्ध १ कोटी लस...
