Tag: लवकरच सर्व समाज प्रतिनिधींसोबत बैठक

आरक्षण उपवर्गीकरणावर सरकार सकारात्मक; लवकरच सर्व समाज प्रतिनिधींसोबत बैठक – गिरीश महाजन

आरक्षण उपवर्गीकरणावर सरकार सकारात्मक; लवकरच सर्व समाज प्रतिनिधींसोबत बैठक – गिरीश महाजन

क्राइम
मुंबई | अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, अतिवृष्टीची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व ५८ समाजांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन निर्णय प्रक्रियेला गती दिली जाईल, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन व संसदीय कार्यमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. धर्माबाद ते मुंबई अशी लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने काढण्यात आलेल्या महापदयात्रेनंतर आंदोलनाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते. एवढ्या पावसात काढलेल्या पदयात्रेतून आंदोलनकर्त्यांची तळमळ आणि संघर्ष दिसून येतो, असे सांगत त्यांनी सर्वांना सुरक्षितपणे घरी परतण्याचे आवाहनही केले. यावेळी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. रामचंद्र भरांडे यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने जाहीर करण्याची मागणी केली. या मागणीसाठी गेली ३५ वर्षे सातत...
error: Content is protected !!