भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार लक्ष्मणराव भवरे यांना जाहीर
नांदेड | नांदेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मारोतीराव भवरे (कामारीकर) यांना यंदाचा “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. 23 मे रोजी नाशिक येथील समुद्र लॉन्स येथे पार पडणार आहे. या सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते तसेच पणतू व रिपब्लिकन सेनेचे युवा नेते अॅड. अमन आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे उप...
