भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने लक्ष्मणराव भवरे यांचा गौरव
आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते नाशिक येथे सन्मान; सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचा गौरव
नांदेड | सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नांदेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मारोतीराव भवरे कामारीकर यांना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
नाशिक येथील समुद्र लॉन्स येथे ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने शनिवारी (दि. 23 मे) देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, इंदू मिल स्मारकाचे प्रणेते व रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते लक्ष्मणर...
