Tag: रेल्वे विकासाला नवी गती

नांदेडमध्ये दक्षिण मध्य रेल्वेची खासदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; महाराष्ट्रासाठी ₹23,926 कोटींची तरतूद, रेल्वे विकासाला नवी गती

नांदेडमध्ये दक्षिण मध्य रेल्वेची खासदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; महाराष्ट्रासाठी ₹23,926 कोटींची तरतूद, रेल्वे विकासाला नवी गती

तेलंगणा, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे विकासकामांना वेग देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधांबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना जाणून घेण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नांदेड येथे खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून ₹23,926 कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील (रेल विकास सदन) परिषद सभागृहात झालेल्या या बैठकीला महाराष्ट्रातील १२ खासदार, नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, सिकंदराबाद विभागाचे डीआरएम डॉ. आर. गोपालकृष्णन, हैदराबाद विभागाचे डीआरएम संतोष कुमार वर्मा तसेच दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाव्यवस्थापक संजय कुमार...
error: Content is protected !!