कुबेर, राही,जोशी, अरबुने यांना राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहिर
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार यांचा होणार गौरव; ग्रंथप्रकाशनाचाही सोहळा
नांदेड| प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान, नांदेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन, नांदेड येथे उत्साहात संपन्न होणार आहे. साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात विविध मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असून, याच कार्यक्रमात दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशनही होणार आहे.
यंदाच्या सोहळ्यात 'मातृश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दैनिक लोकसत्ता, मुंबईचे संपादक मा. श्री. गिरीश कुबेर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
'प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार' यंदा कवी अजीम नवाज राही (बुलडाणा) यांच्या 'वळीवाच्या वेळा' या साहित्यकृती...
