Tag: राष्ट्रध्वज स्थळासमोरच घाणीचा बाजार

वटफळी ग्रामपंचायतीचा कारभार ‘रामभरोसे’! राष्ट्रध्वज स्थळासमोरच घाणीचा बाजार

वटफळी ग्रामपंचायतीचा कारभार ‘रामभरोसे’! राष्ट्रध्वज स्थळासमोरच घाणीचा बाजार

महाराष्ट्र
१५ ऑगस्ट तोंडावर; रस्त्यावर चिखल-पाणी, नाल्या तुंबल्या, RO फिल्टर असूनही ग्रामस्थ तहानलेले — वर्षभर तक्रारी करूनही प्रशासन सुस्त हिमायतनगर, अनिल मादसवार| देशभर स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असताना हिमायतनगर तालुक्यातील वटफळी गावात मात्र राष्ट्रध्वज स्थळासमोरच अस्वच्छता, चिखल आणि साचलेल्या पाण्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. गावातील मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून, ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील व गावाकऱ्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. राष्ट्रध्वज फडकविण्याच्या ठिकाणी स्वच्छता ठेवता येत नसेल, तर ग्रामपंचायतीचा कारभार नेमका चालतो तरी कसा? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. वटफळी येथील मुख्य रस्त्यावर पावसाचे व सांडपाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्या तुंबलेल्या असून पाण्याचा न...
error: Content is protected !!