मराठवाड्यातून संदीप उदगीरकर यांची राज्य कार्यकारिणीवर निवड
नांदेड (प्रतिनिधी) रांजणोली (ता. भिवंडी, जि. ठाणे) येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात नांदेडचे जिल्हाध्यक्ष संदीप उदगीरकर यांची मराठवाडा विभागातून राज्य कार्यकारिणीवर संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे.
या अधिवेशनात संघटनेची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी बाळासाहेब जाधव यांची एकमताने निवड झाली. तर मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करत नांदेडचे जिल्हाध्यक्ष संदीप उदगीरकर यांची संचालकपदी निवड झाल्याने जिल्ह्यातील कंत्राटदारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संदीप उदगीरकर यांनी सांगितले की, जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत, अन्यथा संघटनेकडून कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच केंद्र व राज्य सर...
