Tag: राजेंद्र दर्डा यांना

कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर; राजेंद्र दर्डा यांना प्रथम जीवनगौरव पुरस्कार

कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर; राजेंद्र दर्डा यांना प्रथम जीवनगौरव पुरस्कार

महाराष्ट्र
विजया रहाटकर, डॉ. बालाजी आसेगावकर, मंदार भारदे आणि दिव्या देशमुख यांचाही गौरव नांदेड | मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा दैनिक सत्यप्रभाचा कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार यंदासाठी जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी प्रथमच 'डॉ. शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार' सुरू करण्यात आला असून, त्याचे पहिले मानकरी म्हणून लोकमत समूहाचे एडिटर-इन-चिफ तथा माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, स्नेहसावलीचे संस्थापक डॉ. बालाजी आसेगावकर, मॅब एव्हिएशनचे संस्थापक मंदार भारदे आणि महिला बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुख यांना यंदाचा कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कारासाठी निवड समि...
error: Content is protected !!