हदगावच्या राजकारणात ट्विस्ट; भाजप प्रवेशाच्या चर्चांवर जवळगावकरांचे मोठे वक्तव्य
भाजप प्रवेशाच्या चर्चांना जवळगावकरांचा ब्रेक; "मी काँग्रेसमध्येच, अफवांवर विश्वास ठेवू नका"
हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव-हिमायतनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेत असतानाच जवळगाव येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत, "मी काँग्रेस पक्षामुळेच आज या स्थानावर पोहोचलो आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही," अशी भूमिका मांडली.
जवळगाव येथे झालेल्या बैठकीत तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर आपली मते व्यक्त केली. काहींनी जवळगावकर यांनी काँग्रेसमध्येच राहू...
