पहिल्याच दमदार पावसाने हिमायतनगरची दाणादाण; रस्त्यावर वाहिली गटारगंगा
हिमायतनगर, अनिल मादसवार| मृग नक्षत्र लागल्यानंतर हिमायतनगर शहर व परिसरात बुधवार (दि. 24) रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. या हंगामातील पहिल्याच पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना व पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, या पावसाने हिमायतनगर नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
पहिल्याच पावसात शहरातील अनेक नाल्या तुंबल्याने रस्ते आणि गटारे एकरूप झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हिमायतनगर शहरात आठवडी बाजारासाठी आलेल्या महिला व पुरुष नागरिकांना दुर्गंधीयुक्त घाण पाण्यातून मार्ग काढत बाजार करावा लागला. मुख्य रस्त्यांवर गटारगंगा वाहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
शहरातील आठवडी बाजार परिसर, सराफ लाईन, जनता कॉलनी, आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, बस स्थानक परिसर, चौपाटी मार्केट, ग्रामीण रुग्णालय...
