शहापूर येथे ड्रोनच्या सहाय्याने सोयाबीन पिकावर फवारणी
मजुरांची कमतरता, वेळेची बचत आणि अचूक फवारणी; शेतकरी गटाचा आधुनिक तंत्रज्ञानाकडे कल
देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| खरीप हंगामात शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, शेतीच्या कामांसाठी मजुरांची दिवसेंदिवस जाणवणारी कमतरता आणि वाढलेली मजुरी यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या समस्येवर उपाय म्हणून शहापूर येथील शेतकरी गटाने तब्बल साडेपाच लाख रुपये खर्च करून ड्रोन मशीन खरेदी केली असून, त्याद्वारे सोयाबीन पिकावर फवारणी सुरू केली आहे.
पारंपरिक पद्धतीने पिकांवर फवारणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. मात्र, ग्रामीण भागात मजुरांची संख्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांना फवारणीसह निंदणी, कोळपणी ...
