सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा हिमायतनगरात संताप; राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह व असंवेदनशील वक्तव्याच्या निषेधार्थ हिमायतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. श्री परमेश्वर मंदिरासमोरील मैदानात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी, राजकीय विरोध असला तरी महिलांबाबत अपमानास्पद भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळिमा फासणारी बाब असल्याचे सांगितले. महिलांचा सन्मान अबाधित राखणे ही प्रत्येक राजकीय पक्षाची आणि समाजाची सामूहिक जबाबदारी असून अशा प्रकारच्या कथित वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग...
