ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी एम. डी. शिंदे यांची एकमताने निवड
शहापूर ग्रामपंचायतीतील कर्तव्यदक्ष कार्याची दखल; अधिकारी व मित्रमंडळींकडून अभिनंदन
देगलूर /शहापूर, गंगाधर मठवाले| शहापूर ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सचिव एम. डी. शिंदे यांची देगलूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या कार्यपद्धतीची आणि ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या तत्पर सेवेची दखल घेत ही निवड करण्यात आल्याने अधिकारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
शहापूर ग्रामपंचायतीच्या सचिवपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एम. डी. शिंदे यांनी कार्यालयीन कामकाजाला शिस्त लावत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यावर भर दिला. विशेषतः सकाळच्या वेळेत नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक दाखले व शैक्षणिक कागदपत्रांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे विद्यार...
