यवतमाळ प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांवर मोठी कारवाई; २० लाखांचा मुद्देमाल जप्त
कृषी विभाग व पोलीस प्रशासनाची संयुक्त धडक कारवाई
यवतमाळ| जिल्ह्यात अवैध बियाणे विक्री व वाहतुकीविरोधात कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित एचटीबीटी (प्लॅटिनम 5G) कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे २० लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ‘किया सोनेट’ (GJ-09-5486) तसेच अन्य एका चारचाकी वाहनातून प्रतिबंधित बियाण्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. या आधारे कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या सापळा रचून संबंधित वाहने अडवली.
सदर वाहणाची झडती घेतली असता पथकाला मोठ्या प्रमाणात अवैध बियाणे सापडले. त्यामध्ये: ‘प्लॅटिनम 5G’ कापूस बियाण्यांची ४०० पाकिटे (८ पोते) बियाण्यांची किंमत: ₹३.६० लाख, २ चारचाकी वाहने व ३ मोबाईल फोन इतर साहित्यांसह एकूण...
