Tag: मोठी कारवाई मोहीम सुरू

“ऑपरेशन क्रॅकडाऊन” : नांदेड पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी कारवाई मोहीम सुरू

“ऑपरेशन क्रॅकडाऊन” : नांदेड पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी कारवाई मोहीम सुरू

क्राइम
नांदेड | नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी “ऑपरेशन क्रॅकडाऊन” ही विशेष मोहीम हाती घेतली असून, ३० एप्रिल ते १५ मे २०२६ या कालावधीत ती जोरदार राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत अवैध मटका-जुगार, अंमली पदार्थ (NDPS) तसेच अवैध शस्त्रांवर (धारदार व अग्निशस्त्रे) कडक कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमांमध्ये अंमली पदार्थांविरोधात कारवाईसाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले होते. तसेच अवैध अग्निशस्त्रांविरोधात एका महिन्यात ९ देशी पिस्तूल आणि ७० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. याशिवाय कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान Arms Act अंतर्गत ७० हून अधिक कारवाया करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण जिल्ह्यात अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात “ऑपरेशन क्रॅकडाऊन” राबविले जात आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अध...
error: Content is protected !!