मांजरम येथील सर्व अंगणवाड्यांचे सर्वेक्षण करून नवीन इमारती उभाराव्यात; मूलभूत सुविधा देण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
नायगाव | नायगाव तालुक्यातील मांजरम येथील सर्व अंगणवाड्यांचे तातडीने सर्वेक्षण करून जीर्ण व धोकादायक इमारतींच्या जागी नवीन सुसज्ज अंगणवाडी इमारती मंजूर कराव्यात तसेच शैक्षणिक साहित्य, खेळणी, फर्निचर आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे (मांजरमकर) यांनी गटविकास अधिकारी श्री. वानखेडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मांजरम येथील काही अंगणवाड्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून अंगणवाडी क्रमांक २ ची इमारत वापरण्यास अयोग्य झाली आहे. त्यामुळे लहान बालकांना पर्यायी ठिकाणी शिक्षण घ्यावे लागत आहे. अनेक अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्य, खेळणी, फर्निचर, बसण्याची व्यवस्था, स्...
