नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू; पहिल्याच दिवशी विकासकामांना गतीचे संकेत
नांदेड | नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाची सूत्रे महेश पाटील यांनी गुरुवारी अधिकृतपणे स्वीकारली. पदभार स्वीकारताच त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला गतिमान करण्याचे स्पष्ट संकेत दिले.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी महेश पाटील यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यापूर्वी सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या महेश पाटील यांची शासनाने नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. शासनाच्या लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी...
