नांदेड : ट्रिपल मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपीसह दोघे जेरबंद
नांदेड| शहरातील भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गाजलेल्या ट्रिपल मर्डर प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मुख्य आरोपीसह आणखी एक आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा (खंडणी विरोधी पथक) नांदेड यांनी अत्यंत शिताफीने पार पाडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक 172/2026 अंतर्गत विविध कलमांन्वये नोंद असलेल्या या प्रकरणातील आरोपी साई ऊर्फ साईलाला दिपकसिंग गहेरवार (वय 26) आणि नितेश परमेश्वर इंगळे (वय 22, दोघेही रा. नांदेड) हे गुन्हा घडल्यानंतर फरार झाले होते.
दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री कॅनल रोड परिसरात जुना वाद उफाळून आल्याने प्रफुल उर्फ अजितसिंग गजानन चक्षाण यांच्यावर चाकू व तलवारीने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता. या गंभीर घटनेनंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथके तयार करून आरोपींचा शो...
