मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हिमायतनगर तालुक्यात ग्रामपंचायतींचे मूल्यमापन
लोकाभिमुख कामांची समितीकडून पाहणी; विविध योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
हिमायतनगर | मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हिमायतनगर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात आलेल्या लोकाभिमुख योजनांचे मूल्यमापन तालुका स्तरीय समितीकडून करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने ८ मे २०२६ रोजी हिमायतनगर पंचायत समिती अंतर्गत विविध ग्रामपंचायतींना भेट देत विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
या समितीत सहायक गटविकास अधिकारी अनिलकुमार विसावे (भुसावळ), विस्तार अधिकारी संजोग भारती, केंद्रप्रमुख गोपाल नारायण पाटील, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण सपकाळे, सय्यद इकलास तसेच पत्रकार गोपीचंद सुरवाडे यांचा समावेश होता. समितीने बोरगडी, करंजी, सिरंजनी, सरसम पोटा (बु.) आणि टेंभी या ग्रामपंचायतींमधील विकासकामा...
