मिनी ट्रॅक्टर योजनेमुळे महिला बचत गटांची आर्थिक झेप
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयं सहाय्यता बचत गटांसाठी राबविण्यात येणारी मिनी ट्रॅक्टर योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत ९ ते १८ अश्वशक्ती क्षमतेचे मिनी ट्रॅक्टर व आवश्यक उपसाधने उपलब्ध करून दिली जातात. यामध्ये ९० टक्के शासकीय अनुदान असून उर्वरित १० टक्के हिस्सा बचत गटांकडून दिला जातो. लाभाची रक्कम थेट गटांच्या आधार-संलग्न संयुक्त खात्यात जमा केली जाते.
नांदेड जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून, सन २०२३-२४ मध्ये १० तर २०२४-२५ मध्ये तब्बल ७३ बचत गटांना याचा लाभ मिळाला आहे. यामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत आहे.
आनंदनगर येथील राणी महिला बचत गट हा योजनेचा प्रेरणादायी नमुना ठरला आहे. २०२४-२५ मध्ये निवड झाल्यानंतर या गटाला मिनी ट्रॅक्टर, ट्रेलर ...
