मान्सूनपूर्व तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा; सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर| आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रशासनांनी आपत्ती व्यवस्थापन, पूरनियंत्रण, आरोग्य सेवा, वीजपुरवठा आणि नागरी सुविधांबाबत आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश G. Srikant यांनी दिले.
विभागीय आयुक्तालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी मराठवाड्यातील जिल्हानिहाय मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. शहरी आणि ग्रामीण भागातील नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करावीत तसेच दरवर्षी पाणी साचणाऱ्या ठिकाणांची विशेष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
पूरप्रवण भागांवर विशेष लक्ष
नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता वाढविणे, पूरस्थिती निर्माण झाल्यास स्थलांतरासाठी सुरक्षित ठिक...
