Tag: मात्र ‘कागदावर’ हिरवी!

पंधरा दिवसांपासून पाऊस नाही; हिमायतनगरात सामाजिक वनीकरणाची रोपे मात्र ‘कागदावर’ हिरवी!

पंधरा दिवसांपासून पाऊस नाही; हिमायतनगरात सामाजिक वनीकरणाची रोपे मात्र ‘कागदावर’ हिरवी!

सामाजिक
हिमायतनगर तालुक्यात वृक्षलागवडीच्या नावाखाली शासनाच्या निधीची उधळपट्टी? लावलेली ५० टक्के रोपे वाळली; शेकडो रोपे उघड्यावर फेकली..! सामाजिक वनीकरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..! हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाचा थेंब नाही. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, याच काळात सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या वृक्षलागवडीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. सवना, सिरंजणी, पळसपूर आणि हिमायतनगर परिसरात लावण्यात आलेल्या रोपांपैकी तब्बल ५० टक्के रोपे पाण्याअभावी वाळून गेल्याचा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला आहे. रोपे लावली, फोटो काढले आणि जबाबदारी संपली का? वृक्षलागवड झाल्यानंतर रोपांना पाणी देणे, संरक्षण करणे आणि त्यांचे संगोपन करणे ही विभागाची जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात रोपे लावून त्यांची देखभाल करण्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल...
error: Content is protected !!