Tag: मातृतीर्थ तलाव

मातृतीर्थ तलावात भाविकाचा बुडून मृत्यू; रानडुकराच्या हल्ल्यात दुसरा जखमी

मातृतीर्थ तलावात भाविकाचा बुडून मृत्यू; रानडुकराच्या हल्ल्यात दुसरा जखमी

सामाजिक
२५ किलोमीटर परिक्रमा पूर्ण केल्यानंतर आंघोळीसाठी तलावात उतरला; सहा महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून पित्याचे छत्र हरपले श्रीक्षेत्र माहूर | राज ठाकूर| माहूरगडावर भरणाऱ्या मोठ्या यात्रांपैकी सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रक्षाबंधन परिक्रमा यात्रेला दोन दुर्दैवी घटनांनी गालबोट लागले. परिक्रमा यात्रेसाठी वाशिम जिल्ह्यातून आलेल्या २८ वर्षीय भाविकाचा मातृतीर्थ तलावात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत अनुसया माता मंदिर परिसरातील जंगलात रानडुकराने केलेल्या हल्ल्यात ३५ वर्षीय भाविक जखमी झाला. या दोन्ही घटना २८ ऑगस्ट रोजी घडल्या. २५ किलोमीटर परिक्रमा पूर्ण केली अन् काळाने घात केला वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील गायवळ येथील अनिकेत वाल्मिक तूरक (वय २८) हा आपल्या मित्र, बहीण, पुतण्या यांच्यासह सुमारे १० ते १२ भाविकांसोबत २७ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन परिक्रमा यात्रेनिमित्त माहूर...
error: Content is protected !!