Tag: महावितरणसोबत तातडीची आढावा बैठक

नांदेडमधील वाढत्या वीज तक्रारींवर महापौरांची गंभीर दखल; महावितरणसोबत तातडीची आढावा बैठक

नांदेडमधील वाढत्या वीज तक्रारींवर महापौरांची गंभीर दखल; महावितरणसोबत तातडीची आढावा बैठक

राजकारण
नांदेड | नांदेड शहरातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याने महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी या समस्येची गंभीर दखल घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची आढावा बैठक घेतली. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत पार पडलेल्या या बैठकीत वीजपुरवठ्यातील अडचणी, वारंवार होणारे खंडित पुरवठे, कमी दाबाची समस्या तसेच नागरिकांच्या तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महापौरांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त करत महावितरण अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस उपमहापौर दिपकसिंह रावत, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, माजी उपमहापौर सतीश देशमुख, नगरसेवक संजय मोरे, अभिषेक सौदे, राजू काळे, तुलजेश यादव, राजेश यन्नम यांच्यासह महावितरणचे अधीक्षक अभियंता विनय घनबाहादुर, अतिरिक्त कार्...
error: Content is protected !!