Tag: महावितरण

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मंगरूळमधील नागरिक त्रस्त

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मंगरूळमधील नागरिक त्रस्त

सामाजिक
जीवितहानीची वाट पाहताय का? हिमायतनगर | तालुक्यातील मौजे मंगरूळ गावातील विद्युत समस्यांकडे महावितरण प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, एखाद्याचा जीव गेल्यानंतरच उपाययोजना केली जाणार का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. मंगरूळ येथील रहिवासी गंगाधर पुंजाराम पांडलवाड यांनी उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभागीय कार्यालय हिमायतनगर यांच्याकडे विविध विद्युत कामांसंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला आहे. पांडलवाड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ऑक्टोबर 2025 पासून संबंधित कामांसाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, आजपर्यंत कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत 16 एप्रिल रोजी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनासही बाब आणून द...
कुंडलवाडीत थरारक घटना; क्रिकेटचा चेंडू आणताना 9 वर्षीय मुलगा विद्युत तारेने भाजला

कुंडलवाडीत थरारक घटना; क्रिकेटचा चेंडू आणताना 9 वर्षीय मुलगा विद्युत तारेने भाजला

सामाजिक
कुंडलवाडी | कुंडलवाडी शहरातील चुंगी नाका परिसरात क्रिकेट खेळताना घडलेल्या भीषण अपघातात एका 9 वर्षीय मुलगा गंभीर भाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारच्या सुट्टीत अमेरखान सुलतान खान पठाण (वय 9) हा आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळताना चेंडू जवळच असलेल्या पत्र्याच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सवर जाऊन पडला. चेंडू आणण्यासाठी मुलगा वर चढला असता, वरून गेलेल्या उच्च दाब विद्युत ताऱ्यांच्या संपर्कात येऊन तो गंभीररीत्या जखमी झाला. विजेच्या धक्क्यामुळे त्याच्या कपड्यांना आग लागून तो जळू लागला. घटनेच्या वेळी परिसरातील एका तरुणाने प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कॉम्प्लेक्सवर चढून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी वर बारदानाची पोती फेकली, त्या सहाय्याने आग विझवण्यात आली. या घटनेत मुलगा गंभीर भाजला असून त्याला तातडीने नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आल...
error: Content is protected !!