Tag: महाराष्ट्र

महाराष्ट्रात मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ अभियान सुरू

महाराष्ट्रात मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ अभियान सुरू

महाराष्ट्र
राज्यातील सुमारे 9.86 कोटी मतदारांच्या नोंदींची होणार प्रत्यक्ष पडताळणी नांदेड| भारत निवडणूक आयोगाने भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून देशभरातील मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (Special Intensive Revision) करण्याचे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्राचा या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. यापूर्वी देशात 1952-56, 1957, 1961, 1965-66, 1983-84, 1987-89, 1992-95 आणि 2002-04 या कालावधीत विशेष सखोल पुनरिक्षण करण्यात आले होते. मागील 20 वर्षांत केवळ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण झाले असून मोठ्या प्रमाणात स्थलांतर, नव्या नोंदी आणि वगळण्या झाल्याने मतदार याद्यांमध्ये दुबार नावे असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संविधानाच्या कलम 326 नुसार मतदार यादीत नाव समाव...
पोलिसांचा लातूरमध्ये धडाकेबाज छापा; 13 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

पोलिसांचा लातूरमध्ये धडाकेबाज छापा; 13 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त

क्राइम, महाराष्ट्र
नांदेड/लातूर| अवैध गुटखा विक्रीवर मोठा आघात करत पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने लातूर जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई करत तब्बल 13 लाख रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या गुटखा विरोधी मोहिमेनंतरही काही विक्रेते गुपचूप व्यवसाय सुरू ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 1 एप्रिल रोजी वडवणा (ता. अहमदपूर) येथे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या वेळी एका मारुती इर्टिगा वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा साठा वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनासह सुमारे 6 लाख 24 हजारांचा गुटखा जप्त केला, तसेच एका खासगी कंपनीची सुमारे 13 लाख 24 हजार रुपये किमतीची कारही ताब्यात घेतली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहि...
error: Content is protected !!