Tag: महापौरांचा अधिकाऱ्यांना दणका; स्वच्छता

महापौरांचा अधिकाऱ्यांना दणका; स्वच्छता, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

महापौरांचा अधिकाऱ्यांना दणका; स्वच्छता, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

सामाजिक
नांदेड, प्रतिनिधी| नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटींची गंभीर दखल घेत झोन क्रमांक १ व २ अंतर्गत येणाऱ्या विभागांचा संयुक्त आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले. महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी आपल्या प्रभागांतील नागरिकांच्या समस्या आक्रमकपणे मांडत प्रशासनाला जाब विचारला. बैठकीत झोन १ व २ मधील अनेक भागांत कमी दाबाने व विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यावर महापौरांनी जलवाहिन्यांवरील गळती २४ तासांत दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यास संबंधित अभियंत्याला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शहरातील अंतर्गत रस्ते व मुख्य चौकांमध्ये कचरा साचणार नाही यासाठी घंटागाड्या वेळेवर पाठविणे, नियमित ...
error: Content is protected !!