महात्मा फुले हायस्कूलच्या एनसीसी एअर विंगची दैदिप्यमान कामगिरी
मेन ड्रिल स्पर्धेत प्रथम क्रमांक; दत्ता बारसे यांना 'फर्स्ट ऑफिसर' पदोन्नती
नांदेड | महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर, नांदेड येथील 3 MAH AIR SQN NCC, Pune अंतर्गत कार्यरत एनसीसी एअर विंगने सी.ए.टी.सी.-७१६ (Combined Annual Training Camp-2026) मध्ये दुहेरी यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दि. ५ ते १४ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित शिबिरात महाराष्ट्रातील ११ शाळांच्या एनसीसी पथकांनी सहभाग घेतला होता.
शिबिरातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मेन ड्रिल स्पर्धेत महात्मा फुले हायस्कूलच्या कॅडेट्सनी उत्कृष्ट शिस्त, अचूक संचलन आणि प्रभावी समन्वयाचे दर्शन घडवत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे शाळेसह नांदेड जिल्हा आणि 3 MAH AIR SQN NCC, Pune युनिटच्या नावलौकिकात भर पडली आहे.
या यशामागे एनसीसी एअर विंगचे ए.एन.ओ. दत्ता बारसे यांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण, कठोर पर...

