Tag: महसूल क्रीडा

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड अव्वल; विजेतेपदाची परंपरा कायम

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड अव्वल; विजेतेपदाची परंपरा कायम

क्रीडा
नांदेड| परभणी येथे ३ ते ५ एप्रिल दरम्यान आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ मध्ये नांदेड जिल्हा ने दमदार कामगिरी करत तब्बल ३५५ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या विजयामुळे जिल्ह्याने आपली विजेतेपदाची परंपरा कायम राखली आहे. जालना जिल्हा द्वितीय, तर आयोजक परभणी जिल्हा तृतीय क्रमांकावर राहिला. नांदेड जिल्ह्यातील १९८ खेळाडूंनी क्रीडा स्पर्धेत, तर ४२ कलाकारांनी सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग घेतला. सांघिक क्रीडा प्रकारात कबड्डी, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल आणि ४×१०० रिले (पुरुष) मध्ये प्रथम क्रमांक मिळवत नांदेडने आघाडी घेतली. तसेच खो-खो (पुरुष), जलतरण ४×५० रिले, संचलन तसेच ४×१०० व ४×४०० रिले (महिला) मध्ये द्वितीय, तर टर्फ क्रिकेट (महिला), खो-खो (महिला) आणि जलतरण ४×५० रिलेमध्ये तृतीय क्रमांक मिळवण्यात यश मिळाले. वैयक्तिक क्रीडा प्रकारातही जलतरण, बॅडमिंटन, टेबल टेनिस, धावणे, लांब उडी...
error: Content is protected !!