नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडा; खा. अशोकराव चव्हाण यांची मागणी
रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा
नांदेड| भारतीय रेल्वेने 'दक्षिण तटीय रेल्वे' या नवीन झोनची निर्मिती प्रक्रिया सुरू केली असून, त्या पार्श्वभूमीवर नांदेड रेल्वे विभाग 'मध्य रेल्वे'ला जोडण्याची आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र पाठवून त्यानंतर दूरध्वनीद्वारे चर्चा केली. दक्षिण तटीय रेल्वे झोनच्या निर्मितीनंतर दक्षिण मध्य रेल्वेतील सध्याच्या सहा विभागांपैकी तीन विभाग नवीन झोनमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत, तर नांदेडसह उर्वरित तीन विभाग दक्षिण मध्य रेल्वेकडेच कायम ठेवण्याचे प्रस्तावित आहे.
मात्र, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर हे पाचही विभाग मुंबई मुख्यालय असलेल्या 'मध्य रेल्वे' झोनमध्ये असताना केवळ नांदेड विभाग...
