ऑपरेशन क्रॅकडाऊनचा जबरदस्त दणका! नांदेड जिल्ह्यात मटका-जुगार अड्ड्यांवर एलसीबीची तुफान कारवाई
१५ आरोपी जाळ्यात, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड, विशेष प्रतिनिधी| नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मटका-जुगार अड्ड्यांवर मोठा घाव घातला आहे. नांदेडच्या शिवाजीनगर भागात दोन आणि हिमायतनगर परिसरात एक अश्या तीन ठिकाणी एकाचवेळी धाड टाकत तब्बल १५ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, १ लाख ३० हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू असून, मटका-जुगार, अंमली पदार्थ, धारदार शस्त्रे आणि बेकायदेशीर व्यवहारांवर पोलिसांनी कडक नजर ठेवली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधार...
