Tag: भीषण अपघातात दोन तरुण ठार

रिमझिम पावसात काळाचा घाला; टाकराळा फाट्यावर भीषण अपघातात दोन तरुण ठार

रिमझिम पावसात काळाचा घाला; टाकराळा फाट्यावर भीषण अपघातात दोन तरुण ठार

महाराष्ट्र
बोलेरोची दुचाकीला समोरून धडक; एक गंभीर जखमी, हिमायतनगर–भोकर महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, मंगळवारी रात्री टाकराळा बु. फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. रिमझिम पाऊस सुरू असताना रात्री साडेआठच्या सुमारास बोलेरो जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथील बांधकाम मजूर व मिस्त्री दिवसभर राजवाडी परिसरात काम करून दुचाकीने गावाकडे परतत होते. त्याचवेळी हिमायतनगरकडून भोकरच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो जीपने टाकराळा फाट्याजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की दुचाकीवरील ताहेर बेग महेबूब बेग (३५) आणि शेख युनूस शेख खाजा (३४, दोघेही रा. सोनारी) यांचा जाग...
error: Content is protected !!