Tag: भाविकांना आवाहन

२७ वी अमरनाथ यात्रा जुलैमध्ये; मर्यादित जागा शिल्लक, भाविकांना आवाहन

२७ वी अमरनाथ यात्रा जुलैमध्ये; मर्यादित जागा शिल्लक, भाविकांना आवाहन

धर्म अध्यात्म
नांदेड (प्रतिनिधी) खडतर, साहसी आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी अमरनाथ यात्रा यंदा ३ ते १५ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सलग २६ वर्षांचा यशस्वी अनुभव असलेल्या या यात्रेचे हे २७ वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या केवळ १० जागा शिल्लक असल्याने इच्छुकांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हिंदू धर्मात अमरनाथ यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व असून भगवान शंकराने माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य याच पवित्र गुहेत सांगितल्याची श्रद्धा आहे. या गुहेत दरवर्षी नैसर्गिकरीत्या बर्फाचे शिवलिंग तयार होते, जे या यात्रेचे प्रमुख आकर्षण मानले जाते. यंदाची अधिकृत यात्रा ३ जुलै ते २८ ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची घोषणा जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केली आहे. या यात्रेसाठी...
error: Content is protected !!