Tag: भाजपा स्थापना दिन

भाजपा स्थापना दिनाचा नांदेडमध्ये जल्लोष; खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन

भाजपा स्थापना दिनाचा नांदेडमध्ये जल्लोष; खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन

राजकारण
नांदेड| भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिनानिमित्त सोमवार, ६ एप्रिल रोजी नांदेड दक्षिण जिल्हा कार्यालयात उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. गांधी पुतळ्याजवळील भाजपा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रदेश उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख तसेच महापौर कविताताई मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक “वंदे मातरम्” गीताने झाली. या प्रसंगी डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या संकल्पनेतून पक्षाच्या ४६ वर्षांच्या प्रवासाचे दर्शन घडविणारी विशेष प्रदर्शनी भरविण्यात आली होती. या प्रदर्शनीचे उद्घाटनही अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. स्थापना दिनानिमित्त कार्यालयाची आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती. फटाक्यांची आतिषबाजी करून उपस्थित कार्यकर्त...
error: Content is protected !!