अमरनाथ गुहेतून – भाग ९ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
“गुलमर्गच्या हिरव्यागार कुशीत… निसर्ग, माणुसकी आणि अन्नदानाचा अविस्मरणीय संगम!” - अमरनाथ यात्रेतील प्रत्येक दिवस वेगळा असतो. एखादा दिवस श्रद्धेची परीक्षा घेतो, एखादा शरीराच्या क्षमतेची कसोटी पाहतो, तर एखादा दिवस आयुष्यभर पुरेल एवढ्या आठवणी मनाच्या ओंजळीत अलगद ठेवून जातो. अमरनाथच्या पवित्र गुहेत बर्फानी बाबांचे दर्शन घेतल्यानंतर मनात एक विलक्षण समाधान होते. शरीर थकलेले असले तरी अंतर्मन मात्र प्रसन्न होते. आता यात्रेतील कठीण टप्पे मागे पडले होते आणि आज आमची वाट होती पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलमर्गकडे! सकाळी सात वाजता सर्व यात्रेकरू उत्साहाने तयार झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. अमरनाथ दर्शनाचा आध्यात्मिक आनंद अजूनही मनात ताजा होता आणि आता त्याला काश्मीरच्या अप्रतिम सृष्टीसौंदर्याची जोड मिळणार होती. आमच्या गाड्या श्रीनगरमधून गुलमर्गच्या दिशेने निघाल्या. रस्त्...
