Tag: भाग ६

 अमरनाथ गुहेतून – भाग ६   (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

 अमरनाथ गुहेतून – भाग ६  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

लेख
श्रीनगर ते बालटाल : आता सुरू झाली खरी यात्रा! - काल वंदे भारतच्या अविस्मरणीय प्रवासानंतर आम्ही श्रीनगरला पोहोचलो होतो. आधुनिक भारताचा चमत्कार अनुभवला होता; पण आज आम्हाला सनातन श्रद्धेच्या चमत्काराकडे वाटचाल करायची होती. बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी बालटाल बेस कॅम्प गाठायचा होता. पहाटेपासूनच यात्रेकरूंमध्ये वेगळाच उत्साह दिसत होता. काहींनी स्वेटर, जॅकेट, रेनकोट, मफलर, हातमोजे अशी इतकी तयारी केली होती की ते अमरनाथ यात्रेला चालले आहेत की एव्हरेस्ट सर करायला, असा प्रश्न पडावा! तर काही जण अगदी निवांत होते. “दिलीपभाऊ आहेत ना…” हा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शंभर यात्रेकरूंचा समूह म्हणजे एक छोटे गावच. त्यामुळे व्यवस्थापन सुलभ व्हावे म्हणून पाच गट तयार करण्यात आले—प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड, सिल्व्हर आणि रुबी. प्रत्येक गटाला एक कॅप्टन आणि एक कॅशियर नेमण्यात आला. ही केवळ संघटना...
error: Content is protected !!