कारला गावच्या बोंपिलवार बंधूंची शैक्षणिक भरारी; संगीत विषयात दोघांनी संपादन केली पीएच.डी. पदवी
प्रा. ज्ञानेश्वर व प्रा. नामदेव बोंपिलवार यांचे यश; कारला गावासह हिमायतनगर तालुक्याचा वाढवला गौरव
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील कारला गावातील बोंपिलवार (कार्लेकर) परिवारासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या उल्लेखनीय यशात दोन सख्ख्या बंधूंनी संगीत विषयात विद्यापीठाची पीएच.डी. (डॉक्टरेट) पदवी संपादन केली आहे. प्रा. ज्ञानेश्वर रामदास बोंपिलवार आणि प्रा. नामदेव रामदास बोंपिलवार यांनी संगीत विषयातील सखोल संशोधनाच्या जोरावर अमरावती विद्यापीठाची सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्राप्त केली असून, त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताच्या अभ्यास, संशोधन आणि संवर्धनासाठी दोन्ही प्राध्यापकांनी दीर्घकाळ सातत्यपूर्ण संशोधन कार्य केले आहे. संगीत क्षेत्रातील विविध पैलूंचा अभ्यास करून त्यांनी संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानाची भर घातली आहे. त्यामुळे त्यांच्या या यशामुळे ...
