Tag: बुद्ध पौर्णिमा

हरडफ येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी ; खीरदान व भोजनदानाने धम्ममय वातावरण

हरडफ येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी ; खीरदान व भोजनदानाने धम्ममय वातावरण

धर्म अध्यात्म
हदगांव| तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हरडफ येथे बुद्ध पौर्णिमा अत्यंत उत्साहात आणि बुद्धमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावर्षीच्या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिला मंडळाचा सक्रिय सहभाग आणि त्यांच्या वतीने पंचशील ध्वजारोहण आणि त्रिसरण पंचशीला घेण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पंचशील ध्वजाचे अनावरणकरण्यात आले. यावेळी उपस्थित उपासक-उपासिकांनी सामूहिक बुद्ध वंदना, धम्म वंदना आणि संघ वंदना ग्रहण केली या सोहळ्यामध्ये महिला मंडळाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. सर्व महिलांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून 'धम्म ज्योती बुद्धविहारा'कडे प्रयाण केले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमयी झाले होते.वंदनेनंतर महिला मंडळाच्या वतीने उपस्थित नागरिकांना ख...
error: Content is protected !!