हिमायतनगरातील भारतबाई मादसवार यांचे निधन: बासर येथे गोदावरीत अस्थीविसर्जन
हिमायतनगर | हिमायतनगर शहरातील बजरंग चौक परिसरातील रहिवासी भारतबाई नरसिंगा मादसवार यांचे सोमवार (दि. १८) रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले.
मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर तिसऱ्या दिवशी बुधवारी कुटुंबीयांनी बासर येथे पवित्र गोदावरी नदीत त्यांच्या अस्थींचे विसर्जन केले.
भारतबाई मादसवार या प्रेमळ, शांत स्वभावाच्या आणि कुटुंबवत्सल म्हणून परिचित होत्या. त्यांच्या निधनामुळे मादसवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्या सहशिक्षक धर्मपुरी मादसवार यांच्या मातोश्री तर पत्रकार अनिल मादसवार यांच्या काकू होत्या....
