Tag: बालसाहित्य महत्त्वाचे

बालकांच्या परिपूर्ण विकासासाठी बालसाहित्य महत्त्वाचे : डॉ. सुरेश सावंत

बालकांच्या परिपूर्ण विकासासाठी बालसाहित्य महत्त्वाचे : डॉ. सुरेश सावंत

करियर
नांदेड | बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बालसाहित्य हे प्रभावी माध्यम असून, उत्तम बालसाहित्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते, विचारप्रक्रिया विकसित होते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ तथा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. सुरेश सावंत यांनी केले. उदगीर येथील अहिल्यादेवी गार्डन सभागृहात माजी गटशिक्षणाधिकारी बालाजी बिरादार लिखित 'बोलका ढोल' आणि 'मॅडम मॅडम शाळा सोडा' या दोन बालसाहित्य पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका तथा माजी प्राचार्या सौ. मैनाताई साबणे होत्या. डॉ. सावंत म्हणाले की, बालसाहित्य वाचनामुळे मुलांमध्ये अनुभव आणि कल्पनाशक्तीचा विकास होतो. त्यांची विनोदबुद्धी, मानसिक क्षमता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. घटना-घडामोडींना स...
error: Content is protected !!