तांडा वस्ती सुधार योजनेतील कामात अनियमिततेचा आरोप; बळीराम तांडा येथील नागरिकांची चौकशीची मागणी
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील बळीराम तांडा व पोटा तांडा येथे तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ते व नाली बांधकामात अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित कामांची गुणवत्तापूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे.
ग्रामस्थांनी पंचायत समिती, हिमायतनगरचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनानुसार, पोटा तांडा येथे सि.सी. रस्ता व नाली बांधकामासाठी ७ लाख रुपये, तर बळीराम तांडा येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ७ लाख रुपये असा एकूण १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पोटा तांड्यातील सि.सी. रस्ता बांधकामात नाल्याची माती मिसळून काम सुरू असल्याचा आरोप असून, आवश्यक प्रमाणात...
