सोयाबीन बियाणे प्रकरणात सहा कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल
नांदेड| खरीप हंगाम 2026 मध्ये जिल्ह्यातील सोयाबीन बियाणे उगवण तक्रारी आणि प्रयोगशाळेत अप्रमाणित ठरलेल्या नमुन्यांच्या प्रकरणी सहा बियाणे उत्पादक व पुरवठादार कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात यंदा 4 लाख 56 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावेत यासाठी बियाणे निरीक्षकांनी तपासणी मोहीम राबवली होती. या मोहिमेत 751 सोयाबीन बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.
प्रयोगशाळेच्या अहवालात काही नमुने अप्रमाणित आढळून आले. तसेच बियाण्यांची उगवण न झाल्याबाबत प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पाहणी करण्यात आली. या पाहणीत बियाण्यांमध्ये दोष आढळल्याने संबंधित कंपन्यांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955, बियाणे अधिनियम, 1966, बियाणे नियम, 196...
