Tag: प्रकरणावर पत्रकार संघटनांचा संताप

पत्रकारांना धमकी प्रकरणावर पत्रकार संघटनांचा संताप; संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी

पत्रकारांना धमकी प्रकरणावर पत्रकार संघटनांचा संताप; संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी

महाराष्ट्र
मुंबई | पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषद यांनी तीव्र निषेध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली आहे. पत्रकारांनी त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यासाठी घरी भेट दिली असता, संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत, "पुन्हा आलात तर मारून टाकीन" अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही भाषा एका खासदाराला शोभणारी नसून लोकशाही आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात करणारी असल्याचे पत्रकार संघटनांनी म्हटले आहे. याशिवाय, "माझ्याकडे बॉम्ब आहे" आणि "मी पाच खून के...
error: Content is protected !!