“ऑपरेशन क्रॅकडाउन” अंतर्गत इस्लापूर परिसरात पोलिसांची मोठी संयुक्त कारवाई
नांदेड| जिल्हा पोलीस दलामार्फत ग्रामीण भागातील अवैध दारू निर्मिती व विक्रीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या “ऑपरेशन क्रॅकडाउन” मोहिमेत इस्लापूर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस स्टेशन इस्लापूर हद्दीतील मौजे शिवनी व आजूबाजूच्या दुर्गम भागात पहाटे 4 वाजल्यापासून नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली.
हातभट्टी दारू निर्मितीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन अत्यंत गोपनीय आणि काटेकोर नियोजनातून ही मोहीम पार पडली. या संयुक्त कारवाईत 1 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 10 अधिकारी, 105 पोलीस अंमलदार तसेच 2 RCP प्लाटूनचा सहभाग होता.
हातभट्टी दारू संदर्भात 22 गुन्हे दाखल, मोहमास सडवा : 17,250 लिटर (₹8,62,500 अंदाजे), हातभट्टी दारू : 166 लिटर (₹16,000 अंदाजे), मोहफुले : 1,500 किलो (₹45,000 अंदाजे), रसायनमिश्रित सिंधी : 2 गुन्हे, 2,700 लिटर (₹54,000 अंदाजे), गुटखा प्रकरण : 1 कारवाई (₹48,84...
